विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना व पालकवर्गाना सुचित करण्यात येते की, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या केंद्र सरकार पुरस्कृत National Overseas Scholarship या परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता सन २०२५-२६ या वर्षाकरीता www.nosmsje.gov.in या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहे. याची विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी.
तरी सदर परदेश शिष्यवृत्ती योजनेचा अधिकाअधिक विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.
