Latest Posts

मोतीबिंदू मुक्त विशेष मोहीम चा शुभारंभ : २२ जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र हि विशेष मोहीम भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. हि मोहीम २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविली जाणार आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व मोतीबिंदू रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहे.

यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जुलै, २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय भंडारा येथे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या मोहिमेचा उदघाटन सोहळा साजरा करण्यात आला. हा कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. मिलिंद सोमकुंवर जिल्हा आरोग्य अधिकारी व डॉ. अतुल टेभूर्णे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी डॉ. रेखा धकाते जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा यांनी प्रस्तावना सादर करून या मोहिमेमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक/सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, नेत्रचिकित्सा अधिकारी यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून अधिक शास्त्रकिया करण्याचे आयोजन संपूर्ण भंडारा जिल्हयामध्ये केलेले आहे असे सांगितले.

या उदघाटन सोहळ्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडलेल्या रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. मिलिंद सोमकुंवर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपस्थितांना आपल्या भाषणामध्ये खूप छान मार्गदर्शन केले. मोतीबिंदू झालेल्या व्यक्तीला शस्त्रक्रिया शिवाय पर्याय नसतो. तेव्हा अधिक लोकांनी डोळ्यांची तपासणी करून मोतीबिंदू आढळल्यास सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया करून आपल्या डोळ्यांची काळजी घ्यावी.

तसेच जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा. मोतीबिंदू रुग्णांचे वेळीच निदान व्हावे, गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व्हावी, अंधत्व रोखणे व जनजागृती वाढविणे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकापर्यंत सेवा पोहचविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण जिल्हाभर या मोहिमेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

या कार्क्रमाचे संचालन सोनाली लांबट नेत्रदान समुपदेशक यांनी केले असून या कार्यक्रमाला अधिकारी व कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. महाराष्ट्रातील नागरिकांचे नेत्रस्वास्थ सुधारण्यासाठी तसेच वाढत्या मोतीबिंदूची संख्या व सर्वसामान्य आणि गरीब जनतेपर्यंत सेवा पुरविण्याच्या उद्देश्याने अंधत्व निर्मूलनाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून राबविण्यात येणार आहे.

Latest Posts

Don't Miss