Latest Posts

सी.ए. परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कन्यका वासवी सोसायटी तर्फे सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : येथील आर्य वैश्य समाजाचे दोन विद्यार्थी ओम प्रदीप मिऱ्यालवार व प्रणय प्रवीण चिंतावार यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) २०२५ या अत्यंत कठीण परीक्षेत यश संपादन करून समाजाचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कन्यका वासवी सोसायटी, बल्लारपूर तर्फे त्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या गौरव समारंभावेळी सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब येगिनवार, सचिव प्रदीप मिऱ्यालवार यांच्यासह आनंद भास्करवार, रमण उपगनलावर, हर्षद गंधेवार, गिरीश गंधेवार, सुभाष बोंगिरवार, निलेश गजाडीवार, डॉ. मयूर बंडावार,  श्रीनिवास यमसानिवार, अजय दुशेट्टिवार, नीरज पदमावार, विशाल भोगावार, श्रवण येगिनवार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी दोन्ही यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांचे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा सन्मान समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

Latest Posts

Don't Miss