Latest Posts

सी-६० जवानाच्या हत्येमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या चार जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने केली अटक

– महाराष्ट्र शासनाने चौघांवर जाहीर केले होते एकुण ४० लाख रुपयांचे बक्षीस

– जहाल वरिष्ठ माओवादी दांपत्य रघु आणि जैनी (दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सचिव आणि भामरागड एरीया कमिटीची सचिव) व भामरागड दलमच्या दोन सदस्यांना करण्यात आली अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे माओवादी सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक कार्यवाह्यांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या चार माओवाद्यांस आज १९ एप्रिल २०२५ रोजी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने अटक केली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ९६ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.

आज १९ एप्रिल २०२५ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे ताडगाव येथील पोलीस पथक व ०९ बटा. सिआरपीएफच्या एफ कंपनीचे जवान संयुक्तपणे माओवादीविरोधी अभियान राबवित असताना पल्ली जंगल परिसरामध्ये त्यांना चार संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता येथे आणले असता, सदर इसमांनी आपली नावे १) सायलु भुमय्या मुडेला ऊर्फ रघु ऊर्फ प्रताप ऊर्फ इरपा (डीव्हीसीएस, दक्षिण गडचिराली डिव्हीजन), (५५), रा. लिंगापूर, तह. दरपेल्ली, जि. निजामाचाद (तेलंगाना) (जैनी खराटम हिचा पती), २) जैनी भिमा खराटम ऊर्फ अखीला ऊर्फ रामे (डिव्हीसीएम, भामरागड दलम/सचिव भामरागड एरीया कमिटी), (४१) रा. कंचाला, तह. भोपालपट्टानम, जि. बीजापूर (छ.ग.) (सायलु मुडेला ऊर्फ रघु याची पत्नी), ३) झाशी दोघे तलांडी ऊर्फ गंगु (सदस्य, भामरागड दलम), (३०), रा. येचली, तह. भामरागड जि. गडचिरोली, ४) मनिला पिडो गावडे ऊर्फ सरिता (सदस्य, भामरागड दलम), (२१), रा. कापेवंचा तह. अहेरी, जि. गडचिरोली असे असल्याचे सांगितले. अधिक चीकशी दरम्यान समोर आले आहे की, सदर चौघे इसम हे पोलीसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी असून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने ते पल्ली जंगल परिसरात रेकी करण्यासाठी दाखल झाले होते. तसेच पोलीस चौकशीत उघड झाले की, या चौघे माओवाद्यांचा ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मौजा दिरंगी- फुलनार जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये एका पोलीस जवानाच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. असे निष्पन्न झाल्याने त्यांना पोस्टे कोठी येथे त्या अनुषंगाने दाखल अप क्र. ०१/२०२५ कलम १०३, १०९, १२१ (१), १३२, १८९(२), १९०, १९१ (२), ६१ भा.न्या.स., सहकलम २५, २७, ३, ५ भाहका, कलम ३, ४, ५, भास्फोका, सहकलम १३, १६, १८, २०, २३ बेकायदा कृत्य अधि. व सहकलम १३५ महा. पो. अधि. या गुन्ह्यात आज रोजी अटक करण्यात आली आहे.

अटक माओवादी आरोर्पीची माहिती –
१) सायलु भुमय्या मुड्डेला ऊर्फ रघु ऊर्फ प्रताप ऊर्फ इरपा ऊर्फ सायलु
दलममधील कार्यकाळ – 
– सन १९९० मध्ये सिरनापल्ली दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन काम केले.
– सन १९९० मध्ये बालाघाट येथील परसेवाडा दलममध्ये बदली होऊन सन १९९५ पर्यंत काम केले
– सन १९९५ मध्ये देवरी दमलममध्ये बदली होऊन सन १९९६ पर्यंत काम केले.
– सन १९९६ मध्ये टिपागड दलममध्ये बदली होऊन सन १९९७ पर्यंत काम केले.
– सन १९९७ मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन सन २००० पर्यंत चामोर्शी दलममध्ये काम केले.
– सन २००० मध्ये प्लाटुन क्र. ३ गडचिरोली येथे बदली होऊन सन २००२ पर्यंत काम केले.
– सन २००२ ते माहे ऑगस्ट २००६ पर्यंत पेरमिली दलम कमांडर म्हणून काम केले.
– माहे ऑगस्ट २००६ मध्ये डिव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन सन २०११ पर्यंत मानपूर (छ.ग.) येथे मदनवाडा दलमचा प्रभारी म्हणून काम केले.
– सन २०११ मध्ये प्लाटुन क्र. ३ गडचिरोली येथे बदली होऊन सन २०१२ पर्यंत काम केले.
– सन २०१२ मध्ये सिरोंचा दलममध्ये बदली होऊन सन २०१७ पर्यंत सिरोंचा एरिया कमिटी सचिव म्हणून काम केले.
– सन २०१७ ते २०१९ पर्यंत सिरोंचा दलममध्ये राहून डीकेएएमएस (दंडकारण्य आदिवासी किसान मजदुर संगठन) यांची मिटींग घेण्याचे काम केले.
– सन २०१९ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सन २०२१ पर्यंत ‘भामरागड एरीया कमिटी सचिव पदावर काम केले.
– सन २०२१ मध्ये सप्लाय टिममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर राहून सन २०२४ पर्यंत काम केले.
– माहे नोव्हेंबर २०२४ पासून दक्षिण गडचिरोली विभागीय समितीच्या सचिव पदावर राहून आजपावेतो काम केले.

कार्यकाळात दाखल गुन्हे – 
त्याच्यावर आजपर्यंत एकुण ७७ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ३४ चकमक, ०७ जाळपोळ, २३ खुन व १३ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

२) जैनी भिमा खराटम ऊर्फ अकिला ऊर्फ रामे
दलममधील कार्यकाळ –
– सन २००१ मध्ये पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २००६ पर्यंत काम केले.
– सन २००६ मध्ये छत्तीसगडमधील मदनवाडा दलममध्ये बदली होऊन सन २००८ पर्यंत काम केले.
– सन २००८ मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन सन २०११ पर्यंत मदनवाडा दलममध्ये काम केले.
– सन २०११ मध्ये अहेरी दलममध्ये चदली होऊन सन २०१६ पर्यंत काम केले.
– सन २०१६ मध्ये पेरमिली दलममध्ये चदली होऊन एसीएम पदावर नोव्हेंबर २०१८ पर्यंत काम केले.
– माहे नोव्हेंबर २०१८ मध्ये डिव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन अहेरी एरीया कमिटी इन्चार्ज म्हणून सन २०२१ पर्यंत काम केले.
– सन २०२१ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन डिव्हीसीएम पदावर राहून भामरागड एरीया कमिटीची सचिव म्हणून आजपावेतो काम केले.

कार्यकाळात दाखल गुन्हे –
तिच्यावर आजपर्यंत एकुण २९ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १८ चकमक, ०३ जाळपोळ, ०४ खुन व ०४ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

३) झाशी दोघे तलांडी ऊर्फ गंगु
दलममधील कार्यकाळ –
– सन २०१० मध्ये पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०११ पर्यंत काम केले.
– सन २०११ मध्ये कंपनी क्र. ०४ मध्ये चदली होऊन सन २०२३ पर्यंत काम केले.
– सन २०२३ मध्ये पश्चिम सब झोनल ब्यूरो सप्लाय टिममध्ये बदली होऊन सन २०२४ पर्यंत काम केले.
– सन २०२४ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सदस्य पदावर आजपावेतो काम केले.

कार्यकाळात दाखल गुन्हे –
तिच्यावर आजपर्यंत एकुण १४ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १२ चकमक, ०१ खुन व ०१ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

४) मनिला पिडो गावडे ऊर्फ सरिता
दलममधील कार्यकाळ – 
– सन २०१८ मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०१९ पर्यंत काम केले.
– सन २०१९ मध्ये भामरागड दलममध्ये बदली होऊन सदस्य पदावर आजपावेतो काम केले.

कार्यकाळात दाखल गुन्हे –  
तिच्यावर आजपर्यंत एकुण १० गुन्हे दाखल असून त्यामध्ये ०४ चकमक, ०५ खुन व ०१ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.

शासनाने जाहिर केलेले बक्षीस –
१) महाराष्ट्र शासनाने सायलु भुमय्या मुडेला ऊर्फ रघु ऊर्फ प्रताप ऊर्फ इरपा याच्या अटकेवर २० लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
२) महाराष्ट्र शासनाने जैनी भिमा खराटम ऊर्फ अकिला ऊर्फ रामे हिच्या अटकेवर १६ लाख रूपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
३) महाराष्ट्र शासनाने झाशी दोघे तलांडी ऊर्फ गंगु हिच्या अटकेवर ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते.
४) महाराष्ट्र शासनाने मनिला पिडो गावडे ऊर्फ सरिता हिच्या अटकेवर ०२ लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते.

सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप- महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, कमांडंट ०९ बटा. सिआरपीएफ, शंभू कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) बतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे ताडगाव व सिआरपीएफच्या अधिकारी व जवान यांनी पार पाडली.

यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर जंगल परिसरात माओवाद‌विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Latest Posts

Don't Miss