Latest Posts

अंध कलाकारांच्या ऑर्केस्ट्रा ने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपुर (ballarpur) : अंध क्षेत्रात कार्यरत दृष्टिहीन जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, बल्लारपूर तर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंध कलाकारांचा संगीतमय ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता, त्यात अंध कलाकारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. बल्लारपूर येथील राजे खांडक्या बल्लाळशाह नाट्य सभागृहात २९ मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अंध असणे हे मानवी जीवनासाठी एक मोठे शारीरिक आव्हान आहे, तरीही असे लोक त्यांच्या कमतरतेवर मात करून कलेचे गुण आत्मसात करतात. अशा कलाकारांना धाडस आणि हिंमत मिळावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात आशियाई विक्रम धारक १६ वर्षीय अंध जलतरणपटू ईश्वरी पांडे हिचाही गौरव करण्यात आला. अनेक वर्षांपासून अंध जनकल्याण बहुउद्देशीय संस्था अविरतपणे कार्यरत असून दरवर्षी ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून अंध कलाकारांना एक अद्भुत व्यासपीठ उपलब्ध करून देते. ऑर्केस्ट्रा मेलोडी संस्था, नागपूर यांनी सादर केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून दिलीप गेडाम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रेमानंद खंडाळे, बल्लारपूर पेपर मिलचे महाव्यवस्थापक सतीश मोहन, सामाजिक कार्यकर्त्या सरोज बद्द्लवार, अरुण लाडे व रिता लाडे यांनी अंध कलाकारांचे अभिनंदन व मार्गदर्शन केले. सतीश शेंडे यांच्या समन्वयाने संस्थेचे अध्यक्ष दिलीप गेडाम, कोषाध्यक्ष लालसरे, सचिव शालिनी रामटेके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच रमेश बावणे, नीलेश कुकुडकर, संगीता शेंडे, भूपेश रामटेके, श्रद्धा शेंडे, गौरी शेंडे, सुमेध शेंडे यांनी अथक परिश्रम घेऊन महत्त्वाचे सहकार्य केले.

Latest Posts

Don't Miss