विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (ballarpur) : ६ एप्रिल ला ४६ वा भाजपा स्थापना दिन निमित्त भाजप कार्यालय बल्लारपूर मध्ये आयोजित कार्यक्रमास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्तच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी स्थापना दिनानिमित्त भारत मातेच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून त्यानंतर पक्षाचा ध्वजारोहण करण्यांत आला. या वेळी भाजपा चे ज्येष्ठ नेते तथा माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ चंदनसिंग चंदेल यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केले.
तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष भाजपा जिल्हा अध्यक्ष हरिष शर्मा यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, शिवचंद द्रिवेदी, निलेश खरबडे, समीर केणे, महामंत्री मनीष पांडे, भाजयुमो अध्यक्ष रनंजय सिंह, महिला मोर्चा अध्यक्ष वैशालीताई जोशी, देवा वाटकर, घनश्याम बुरडकर, गुलशन शर्मा, सतिश कनकम सह माजी नगरसेवक, शक्ती केंद्र, बूथ प्रमुख यांचेसह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, बहूसंख्य कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
