Latest Posts

बीआयटी मध्ये प्रोजेक्ट एक्झिबिशन २K२५ संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बामणी येथे आयोजित करण्यात आलेल्या इन्स्टिट्यूट लेव्हल प्रोजेक्ट एक्झिबिशन २K२५ या वार्षिक प्रकल्प प्रदर्शनाचा यशस्वी समारोप झाला. या कार्यक्रमात सर्व विभागांनी आपापल्या क्षेत्राशी संबंधित नाविन्यपूर्ण आणि गतिशील प्रकल्प सादर केले.

या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य श्रीकांत गोजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून सिव्हिल विभागाचे विभागप्रमुख प्रा. आकाश गाईन आणि मेकॅनिकल विभागाचे प्रा. मयूर इटनकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच, सांस्कृतिक आणि कार्यक्रम समितीच्या सदस्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

या वर्षीच्या प्रकल्प प्रदर्शनात सिव्हिल विभागाच्या वेस्ट प्लास्टिकचा वापर करून पेव्हर ब्लॉक तयार करणे या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. या अभिनव प्रकल्पाने पर्यावरणपूरक बांधकामाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. हा प्रकल्प सिव्हिल विभागाच्या विद्यार्थिनी अलीशा येळेकर आणि पायल पोर्टे यांनी सादर केला होता.प्राचार्य गोजे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले, प्रोजेक्ट एक्झिबिशन २K२५ हे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि तांत्रिक कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याची संधी मिळते.

संस्थेच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, त्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना आणि प्रकल्प सादरीकरणाला भरभरून दाद देण्यात आली.

Latest Posts

Don't Miss