Latest Posts

भारतीय जनता पार्टी बेटी बचाओ बेटी पढाओ महाराष्ट्र व्दारा आयोजित घर तिथे रांगोळी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : भारतीय जनता पार्टी बेटी बचाओ बेटी पढाओ महाराष्ट्र व्दारे सुचनेतुनसा देवळी शहर मंडळ, त. देवळी जि. वर्धा (महाराष्ट्र) व्दारा भाऊजीज निमीत्य बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर आधारीत घर तिथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन माजी नगराध्यक्ष शोभा रामदासजी तडस यांनी केले, विजेत्यांना आकर्षक बक्षिस म्हणुन प्रथम पुरस्कार रु. ५ हजार १, द्वितीय पुरस्कार रु. ३ हजार १, तृतीय पुरस्कार २ हजार १ व प्रोत्साहनस्पर पुरस्कार दोन देण्यात येणार आहे.

देवळी येथे बेटी बचाओ बेटी पढाओ महाराष्ट्र व्दारा आयोजित घर तिथे रांगोळी स्पर्धेला भव्य प्रतिसाद मिळाला असुन या घरोघरी जाऊन रांगोळीचे निरीक्षण आज करण्यात आली. यावेळी भाजपा बेटी बचाओ बेटी पढाओ प्रदेश संयोजीका पश्चिम विदर्भ निलीमा तातेकर, शोभा तडस, शुभांगी कुर्जेकर, छाया तडस, माधुरी तडस व टिम, माया वडेकार, ज्योती खाडे, वैशाली समर्थ, विश्वजिता पोटदुखे, विद्या झिलपे, योगिता बुबन, मनिषा लोखंडे, सुनिता बकाने, नेहा दुबे, रवी कारोटकर उपस्थित होते.

सर्व रांगोळीची निरीक्षण करण्यात आलेले असुन सर्व रांगोळीमधुन प्रथम, व्दितीय, तृतीय व प्रोत्साहन पुरस्कार निवड करण्यात येईल व त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

Latest Posts

Don't Miss