– पाविमुरांडा येथे इलाका गोटूल सभामंडपाचे भूमिपूजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : गेल्या पंचवीस वर्षात जो विकास झाला नाही तो विकास आम्ही पूर्ण करीत आहोत. माझ्या नऊ वर्षाच्या काळात भरपूर विकास झाला आहे.
१५ नोव्हेंबर २०२३ ते १४ जानेवारी २०२४ पर्यंत भारत संकल्प विकास यात्रा सुरू असून या माध्यमातून गावागावात योजना पोहचणार असे, प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ.डॉ. देवराव होळी यांनी केले. पाविमुरांडा येथील इलाका गोटूल सभामंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इलाका जमीनदार अशोक रायसिडाम, सरपंच माधुरी आतला, इलाका गोटूल समितीचे अध्यक्ष केसरी मट्टामी, माजी सरपंच भाऊराव कुमरे, ग्रा.प. सदस्य मधुकर किवासे, पत्रकार पुंडलिक भांडेकर, पुसेर ग्रामसभा अध्यक्ष नामदेव मट्टामी, रामू हेडो, मधुकर दुगा, बाबुराव झुरी, नामदेव वासेकर, रंजना पांडे आदी उपस्थित होते.
आ.डॉ. देवराव होळी पुढे बोलले की, इलाका गोटूल सभामंडपाच्या बांधकामासाठी वीस लाख रुपये मंजूर केले असून, दोन ते तीन महिन्यात बांधकाम पुर्ण होणार आहे. सांस्कृतिक सभागृह, बसेस सेवा, पविगडचा विकास लवकरच होणार आहे. आदिवासिंच्या विकासात कुठलीही कमतरता भासू देणार नाही. मात्र आदिवासींनी विकासाच्या प्रवाहात येणे गरजेचे आहे.
मुतनूर देवस्थान पर्यटनासाठी अडीच कोटीचा निधी दिला असून, बावीस गावे मिळून निर्माण झालेल्या इलाका समितीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आ.डॉ. देवराव होळी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन भाऊराव कुमरे यांनी केले तर आभार केसरी मट्टामी यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
