Latest Posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

– ८ ते १४ एप्रिल कालावधीत राबविण्यात येणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा ( wardha) : अनुसुचित जाती, अनुसुचित जनजाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी तसेच योजनांची जनजागृती निर्माण व्हावी यासाठी ८ ते १४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी सामाजिक समता सप्ताहात सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.

८ एप्रिल रोजी सामाजिक न्यायभवन येथे सप्ताहाचे उदघाटन होणार असून यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच वाचन करण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. ९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय वसतीगृहे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघु नाट्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.

१० एप्रिल रोजी  समतादूत प्रकल्प बार्टी मार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका व्दारे योजनांबाबत प्रबोधन ११ एप्रिल रोजी  सामाजिक न्यायभवन येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रम  व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात  लाभाचे वितरण करण्यात येणार आहे.

१२ एप्रिल रोजी समाजकार्य महाविद्यालयात संविधान जागर व्याख्यान, महिला मेळाव्याचे आयेाजन, १३ एप्रिल रोजी अनुसुचित जाती मुलांचे वसतीगृह उमरी मेघे वर्धा, येथे जेष्ठ नागरिक जनजागृती शिबिर व रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन, अनुसुचित नवबौध्द घटकातील वस्तीत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

१४ एप्रिल रोजी सामाजिक न्यायभवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व समता सप्ताहा समारोप व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान  मेळावा व व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे

Latest Posts

Don't Miss