Latest Posts

स्वाधार योजनेच्या लाभासाठी  विद्यार्थ्यांनी सहामाही उपस्थिती व बँक तपशिल अद्यावत करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राज्यस्तरीय सन २०१६ – २०१७ पासून लागू करण्यात आली. शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुलामुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.

२६ डिसेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यानी सन २०२४ – २०२५ मध्ये स्वाधार योजनेचा https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने स्वाधार योजनेचा अर्ज केला आहे. त्या विद्यार्थ्यांना सहामाही उपस्थिती भरण्यासाठी तसेच बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांनी सहामाही उपस्थिती व बँक तपशिल अद्यावत करण्यात यावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकीय आय. टी. आय समोर, श्रध्दानंद पेठ, दीक्षाभूमी चौक, नागपूर येथे संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss