विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित, अकोला अर्थात महाबीजची स्थापना २८ एप्रिल १९७६ रोजी झालेली असुन महाबीजने आज ५० व्या वर्षात पदार्पण केले, महाबीजला शेतक-यांची बियाणे कंपनी म्हणुन संपुर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जाते.
महाबीजचा भंडारा जिल्हयाचा ४९ वा वर्धापन दिन बिज प्रकिया केंद्र, गडेगाव येथे जिल्हा व्यवस्थापक सुभाष मेश्राम याच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमास महाबीजचे बिजोत्पादक, भागधारक शेतकरी, विक्रेते, सर्व कर्मचारी व जिल्हा व्यवस्थापक सपत्निक उपस्थित होते.
कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे व महाबीजचे भागधारक केशवराव बांते, कन्हळगाव तहसिल मोहाडी व भास्कर मेश्राम, कन्हळगाव तहसिल मोहाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करतांना कार्यकमाचे अध्यक्ष सुभाष मेश्राम यांनी महाबीजचा आतापर्यंतचा प्रवास व भविष्यातील महाबीजचे धोरणा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
जैविक शेती आज काळाची गरज असुन जैविक शेतीसाठी महाबीजकडे उपलब्ध असलेले हिरवळीचे पिक देचा, जिवाणु खते व ट्रायाकोडर्माचे महत्व उपस्थित शेतकरी वर्गास सांगितले व यास सर्व उपस्थित वगनि बांगला प्रतिसाद दिला.मानवी जिवनात वृक्षाचे महत्व असाधारण असल्यामुळे व पर्यावरण पुरक असल्यामुळे उपस्थित अतिथी व कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत जिल्हा व्यवस्थापक सुभाष मो. मेश्राम यांनी वृक्ष रोपणाचा शुभांरभ केला व एकुण सतरा वेगवेगळ्या वृक्षाची गडेगाव विज प्रकिया केंद्र येथे लागवड करण्यात आली.
उपस्थित बिजोत्पादक, भागधारक शेतकरी, विक्रेते व कर्मचारी यांचा शॉल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक कृषि क्षेत्र अधिकारी सुधिर पिल्लेवान व आभार प्रदर्शन कृषि क्षेत्र अधिकारी पल्लवी बन्सोड यांनी केले.
