विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : ग्रीष्मकालीन सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथून नागपूरकडे एकफेरी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०१७ CSMT- नागपूर एक फेरी विशेष गाडी खालीलप्रमाणे चालविण्यात येईल.
गाडी क्रमांक ०१०१७ CSMT- नागपूर एकफेरी विशेष गाडी २७ एप्रिल २०२५ रोजी (२६/२७ एप्रिलच्या मध्यरात्री) CSMT वरून ००.२० वाजता प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मळखेड, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा आणि नागपूर.
कोच रचना : या गाडीमध्ये एकूण २१ कोच असतील, ज्यामध्ये २ एसएलआर/डी, ६ सामान्य श्रेणी, १० स्लीपर, २ एसी ३- टियर (ACCN) आणि १ एसी २- टियर (ACCW) कोचचा समावेश आहे.
तिकीट आरक्षण : या विशेष गाडीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in वर उपलब्ध आहे. तपशीलवार वेळापत्रक आणि थांब्यांची माहिती www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES मोबाईल अॅपवर मिळवता येईल.
