Latest Posts

बल्लारपूर शहरात आयपीएल क्रिकेट वर ऑनलाईन सट्टा ?

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur ): बल्लारपूर शहरात आयपीएल क्रिकेट वर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या एका युवकाला बल्लारपूर पोलीसांनी अटक केले. अमितकुमार मुटुकधारी सिंह (२७) न्यू मायनर्स क्वार्टर, भगत सिंग वॉर्ड बल्लारपूर असे आरोपीचे नाव असून सदर कारवाई शनिवार रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास केली.

बल्लारपूर गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी स्टेशन हद्दीत अवैध दारू, जुगार रेड करण्याकरिता पेट्रोलिंग करत असताना भगत सिंग वॉर्ड येथील ऑटो स्टँड वर एक युवक आयपीएल क्रिकेट मॅच वर बेटिंग घेत आहे. त्यावरून पोलिसांनी अमितकुमार मुटुकधारी सिंह (२७) न्यू मायनर्स क्वार्टर, भगत सिंग वॉर्ड बल्लारपूर याचे मोबाईल घेईन अधिक चौकशी केली असता त्याच्या मोबाईल मध्ये क्रिकेट बेटिंग चे स्क्रीनशॉट दिसले.

त्याच्या मोबाईल मध्ये गुजरात टायटनस विरुध्द दिल्ली कॅपिटलस ऑनलाईन क्रिकेट बेटिंग सुरू होती. त्याच्य मोबाइल मध्य गूगल क्रोम मधील INFINITY ७७७ top २०२० pro, Radhe Exchange नामक साईट वरून बेटिंग केलेली दिसली. तसेच त्या साईट वर लाखो रक्कम भरले होते. तिथून वजा करून काही रक्कम शिल्लक दिसले. या वरून बल्लारपूर शहरात आयपीएल क्रिकेट वर सट्टा खेळले जात आहे असे दिसून येते. युवक त्याच्या नादी क्रिकेट सट्टाचा नादी लागून आयुष उद्ध्वस्त होत आहे.

पोलीसांनी आरोपी अमितकुमार मुटुकधारी सिंह (२७) विरुध्द अप क्रं २८४/२०२५, कलम १२(अ) महारष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला असून एक मोबाईल किंमत १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, हवालदार संतोष पंडित, हवालदार रणविजय ठाकुर, हवालदार सत्यवान कोटनाके, हवालदार संतोष दंडेवार, पोअं विकास जुमनाके, पोअं वशिष्ठ रंगारी, पोअं कारूष, पोअं खंडेराव माने, पोअं मिलिंद आत्राम, पोअं शेखर माथनकर यांनी केले.

पुढील तपास बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्याम गव्हाणे करीत आहे.

Latest Posts

Don't Miss