Latest Posts

बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्य पदाच्या नियुक्तीसाठी अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : बाल न्याय नियमांतर्गत बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात येते. बाल कल्याण समिती ही काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांकरीता काम करीत असते. जिल्हास्तरीय बाल कल्याण समितीची स्थापना करण्यासाठी समितीच्या अध्यक्ष पदाकरीता व चार सदस्य पदासाठी निवड करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

इच्छुक पात्र उमेदवारांनी अटी व शर्तीची पुर्तता करुन विहित नमुन्यातील अर्ज, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव व इतर तत्सम आवश्यक कागदपत्रास जिल्हात महिला व बाल कल्याण कार्यालयात १५ दिवसाचे आत सादर करावे, अधिक माहिती www.maharashtra.gov.in व https;//wcdcommpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss