Latest Posts

एप्रिल २०२५ साठी शिधावस्तू वाटपाचे परिमाण जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत एप्रिल २०२५ महिन्यासाठी शासनाकडून प्राप्त नियतनानुसार रास्तभाव दुकानदारांना शिधावस्तूचा पुरवठा करून पात्र शिधापत्रिका धारकांना तातडीने मोफत वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिधावस्तूंचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

प्राधान्य कुटुंब (पीएचएच) लाभार्थींसाठी :

तुमसर, मोहाडी, भंडारा, लाखनी, साकोली, पवनी व लाखांदुर येथे :
गहू: १ किलो प्रति लाभार्थी
तांदूळ: ४ किलो प्रति लाभार्थी

अंत्योदय अन्न योजना (एएवाय) लाभार्थींसाठी:

तुमसर, मोहाडी, भंडारा, लाखनी, साकोली, पवनी व लाखांदुर येथे :

गहू: १० किलो प्रति लाभार्थी
तांदूळ: १५ किलो प्रति लाभार्थी

शिधावस्तूंचे वितरण तातडीने सुरू करण्यात आले असून लाभार्थ्यांनी आपल्या निर्धारित रास्तभाव दुकानातून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Latest Posts

Don't Miss