विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट १९४९ तसेच सुधारित अधिनियम २०२१ अन्वये गडचिरोली जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालये / नर्सिंग होम / दवाखाने/क्लीनीक / डे – केअर सेंटर धारकांना सुचित करण्यात येते की, मंत्री महोदयांनी १५ ऑगस्ट २०२४ पासून राज्यातील सर्व खाजगी रुग्णालय आस्थापनांची नोंदणी व नुतनीकरण https://maha_mnhregistration.co.in पोर्टलवर करणे बंधनकारक करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालय आस्थापनांची नोंदणी व नुतनीकरण या पोर्टलवर करावे तसेच ज्या रुग्णालयांची नोंदणी झालेली आहेत त्यांनी सुद्धा नव्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने https://maha_mnhregistration.co.in या डोमेनवर Live करण्यात आले असुन याबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास या पोर्टलवर User Manual आणि नर्सिंग होम ॲक्ट डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ते डाऊनलोड करुन त्यातील सूचनेप्रमाणे माहिती भरावी किंवा ९१७२६५०९१७ या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करावा. असे जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.
