Latest Posts

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या राज्य स्तरीय बैठकीस माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती

– राज्य सरकार द्वारा  आदिवासी आयोग निर्माण करण्याच्या निर्णयावर माजी आमदार तथा विकास परिषदेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी मांडला अभिनंदनाचा ठराव.

– अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची राज्य स्तरीय बैठक अमरावती येते रामसाहेब चव्हाण यांच्या फार्म हाऊस वर घेण्यात smsngoraipur@gmail.com

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /गडचिरोली (Gadchiroli) :smsngoraipur@gmail.com ला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ. भा. आ. विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामसाहेब चव्हाण हे होते तर विशेष अतिथी म्हणून माजी आमदार तथा विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवराव होळी, तर प्रमुख पाहुणे म्हणून केशव तिरणिक चंद्रपूर, नंदिनी टारपे राज्य महिला अध्यक्ष, विवेक नागभीडे नागपूर, राजे वीरेंद्र शहा नागपूर हे उपस्थित होते.

या राज्य स्तरीय बैठकीत खालील विषयावर विचार – विनिमय करून ठराव सर्वानुमते मते मंजूर करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने १) लाखाचा निधी पूर्वीने. २) प्रत्येक जिल्ह्यातून १ लाखाचा निधी जमा करणे. ३) परिषदेच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यास मानधन देणे. ४) प्रदेशाध्यक्ष रामसाहेब चव्हाण यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन करणे. ५) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणे. आदी ठराव घेऊन समंत करण्यात आले.

या वेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी साहेब यांनी आदिवासी आयोग निर्माण केल्याबद्दल राज्य सरकारचा अभिनंदनाचा ठराव ठेवला. सोबतच आदिवासी आयोग निर्माण केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मा.

एकनाथजी शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके याचे सुद्धा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. या ठरवाला विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रामसाहेब चव्हाण, प्रदेश महासचिव विवेक नागभीडे  यांनी अनुमोदन देऊन ठराव पास करण्यात आला. यावेळी उपस्तित परिषदेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतानी माजी आमदार डॉ. देवराव होळी साहेब म्हणाले कि, संघटना मजबूत करण्यासाठी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तन-मनाने कार्य करावे.

सोबतच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील आदिवासी पर्यंत पोहचून त्यांच्या समस्या लक्षात घेऊन काम करणे गरजेचे आहे. तरच तळागाळातील आदिवासी समाज बांधव विकास परिषदेशी जुळतील व परिषदेला भरभराटी मिळेल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांस महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यात प्रामुख्याने उमेश उईके, लक्ष्मन वागणकर, उमा घासले, शाम कारलेकर, नितीन मसराम, प्रशांत कुमरे, विनोद मसराम, सोपान सोळंके, संतोष आतराम, अमोल राने, निलेश पवार, राजेश टारपे, सीमा धंदरे, माधव दांडेगावकर, अशोक चव्हाण, अमोल राठोड, श्रीकृष्ण पवार, विजय सिडाम, बाबुराव जुमनाके, रमेश धुर्वे, जनार्धन गेडाम, परमेश्वर गावंडे आदी उपस्थित होते. बैठकीचे संचालन व प्रास्ताविक प्रदेश सहसचिव शशिकांत कोवे यांनी केले.

Latest Posts

Don't Miss