Latest Posts

एजंटसची परीक्षा २२ नोव्हेंबरला : राज्यातील १९ केंद्रांवर ऑनलाईन होणाऱ्या या परीक्षेला बसणार ५ हजार ५९२ पात्र उमेदवार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : स्थावर संपदा क्षेत्रातील आणखी ५ हजार ५९२ उमेदवार अपेक्षित प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून २२ नोव्हेंबर रोजी राज्यात १९ केंद्रांवर ऑनलाईन होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. यात मुंबई महाप्रदेशातील २ हजार ७३२ , पुणे २ हजार १०४, नागपूर ५९२, नाशिक ७८, कोल्हापूर २६, औरंगाबाद २०, अहमदनगर ८, अकोला ६, सोलापूर ५, अमरावती , नांदेड, सांगली आणि सातारा प्रत्येकी ३ ,चंद्रपूर २ , धुळे ,लातूर , पंढरपूर आणि वर्धा येथील प्रत्येकी १ उमेदवार सहभागी होणार आहेत.

आतापर्यंत २ वेळा झालेल्या परीक्षेत ३ हजार २१७ उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत. राज्यात सुमारे ४५ हजार एजंटस नोंदणीकृत होते. यापैकी १३ हजार एजंटसनी नुतनीकरण न केल्याने राज्यात सध्या ३२ हजार एजंटस कार्यरत आहेत. स्थावर संपदा क्षेत्रातील ‘एजंट’ हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात.

त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार( Agreement for Sale), घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र ( Allotment letter) चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.

Latest Posts

Don't Miss