विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची (korchi) : येथिल गोटूल भूमी खुनारा (कोरची) येथे सरपंच संघटना आणि ग्रामसभाचे महासंघ आणि स्थानिक संघटना एकत्रित बैठक घेऊन सोहले आणि झेंडेपार येथे लोह प्रकल्पाच्या कामाचे सद्या : स्थिती विषयी चर्चा करण्यात आले. यात झेंडेपार येथे लोह प्रकल्पाचे काम सुरु झालेले नाही. परंतु सोहले येथे में अजंता मिनरल्स कपंनी ने ६५ हेक्टर आर मध्ये कामाला सुरुवात केलेली आहे.स्थानिक ग्रामसभांचा या कंपनीला तीव्र विरोध असून, सुद्धा शासन कुढल्याही प्रकारे ग्रामसभांचे मत विचारात न घेता लोह प्रकल्पाच्या कामाला मंजुरी दिली आहे. आणि मागील दोन महिन्यापासून लोह प्रकल्पाच्या कामाला सुरुवात म्हणून रस्ताचे काम आणि धर्मकाटाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. असे स्थानिक ग्रामसभा प्रतीनिधिनी आजच्या बैठकीत सांगितले. यावर बैठकीत उपस्थित सदस्यांनी आणि संघटनानिं आपले मत व्यक्त केले.
सविस्तर चर्चा याप्रमाने करण्यात आले की, गडचिरोली जिल्हात सुरजागड येथे सुरु असलेल्या कंपनी चा आजूबाजूच्या परिसरातील लोकांवर होणारे दुष्परिणाम विषयी चर्चा झाली. अशाच प्रकारे कोरची तहसील मधील सोहले, झेंडेपार, आगरी, मसेली, बोडेना, भर्रिटोला या गावात लोह प्रकल्पाचे काम सुरु झाले तर तालुक्यातील इतर गावामध्ये दुष्परिणाम होणार आहे. आमचे सामुहीक जंगलाचे हक्क, शेतीचे नुकसान, पाण्याचे प्रश्न नेहमी उद्भभवणार आहेत. त्याच प्रमाणे जंगलातील संपूर्ण जैवविविधता वर परिणाम होणार. सद्या फक्त सोहले येथील ६५ हेक्टर आर मध्ये लोह प्रकल्पाचे काम सुरु झाले.
त्यावर स्थानिक संघटनने चर्चा करून असे ठरविले आहे कि, आम्हाला जंगल आधारित शाश्वत विकास हवा आपल्या तालुक्यात पर्यावरणाला नुकसान करणारे विकास नको असे चर्चा मध्ये उपस्थित लोकांनी आपले मत व्यक्त केले आणि याचा विरोधात पुढील पाउल उचलण्याचे ठरविण्यात आले. सरपंच संघटना एकत्रित येऊन लोह प्रकल्पाच्या कामाला विरोध करणे. आणि सोहले येथे सुरु असलेले लोह प्रकल्पाचे काम तातडीने बंद करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी साहेबगडचिरोली यांना या आठवड्यात देण्याचे ठरविण्यात आले.
ग्रामसभाचे महासंघ आणि प्रकल्प ग्रस्त ग्रामसभांनी व स्थानिक संघटनानी लोह प्रकल्पाच्या कामाला विरोध करणे. आणि सोहले येथे सुरु असलेले लोह प्रकल्पाचे काम तातडीने बंद करण्यात यावे असे निवेदन आणी ठराव जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांना या आठवड्यात देण्याचे ठरले.
जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांना सरपंच संघटना, महाग्रामसभाचे प्रतिनिधी आणि ग्रामभाचे प्रतिनिधी प्रत्येक्ष भेटून लोह प्रकल्पाचे काम बंद करण्यासंदर्भात चर्चा व निवेदन देण्याचे ठरविले.
जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली याना निवेदन दिल्यानंतर पुढील कुठलीही कार्यवाही केले नसल्यास, कोरची तालुक्यातील ग्रामसभांचे संघटना व सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेळण्यात येईल असे सर्वांनी मान्य केले.
सदर बैठकीत राजाराम नैताम अध्यक्ष महाग्रामसभा कोरची, कुमारीबाई जमकातन सचिव महाग्रामसभा कोरची, धनीराम हिडामी अध्यक्ष सरपंच संघटना कोरची, सुनील सयाम सचिव सरपंच संघटना, सियाराम हलामी महाग्रामसभा सल्लागार, झाडूराम हलामी महाग्रामसभा सल्लागार, गणेश हुलगे आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा, रमेश तुलावी सरपंच – दवंडी, वीरेंद्र जांभूळकर उपसरपंच-मसेली, महेश लाडे ग्रामसभा सोहले, इजामसाय काटेंगे महाग्रामसभा सल्लागार, तीजनबाई जेठूमल महाग्रामसभा सदस्य, कविताबाई रक्षा ग्रामसभा दवंडी, रुपेश कुमरे ग्रामसभा सावली, श्रीराम कल्लो ग्रामसभा झेन्डेपार, चेतन चौधरी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा, हर्षल धाबेकर आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा, शिवाजी नुरुटी ग्रामसभा कुक्डेल, वीरेंद्र जुळा ग्रामसभा साल्हे, पेमनदास जेठूमल आदि सदस्य उपस्थित होते.
