– क्रातीवीर भगवान बिरसा मुंडा सभागृह, देवळी येथे क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांच्या १४८ व्या जयंती निमीत्य भव्य शोभायात्रा व समाज प्रबोधन कार्यक्रम संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) (देवळी) : भारतीय स्वातंत्र्यलढयात आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांनी आपल्या २५ वर्षाच्या अल्पजीवन कालावधीमध्ये त्यांनी आदिवासींमध्ये स्वदेशी व भारतीय संस्कृतीची प्रेरणा जागवली ती अतुलनीय आहे. न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्यायला तोड नाही. त्यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा कीताब जनतेनेच बहाल केला. आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊनच केंद्र व राज्य सरकार आदिवासी समुदायांच्या सशक्तीकरणासाठी कार्य करीत आहे, देशाचे लोकप्रीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळात आदिवासी परंपरा आणि त्यांच्या शौर्यगाथांना एक भव्य ओळख द्यायचा निर्णय देशाने घेतलाय. त्यामुळेच १५ नोव्हेंबर हा दिवस भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीच्या निमित्ताने आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असल्याचे, प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी देवली येथे आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
क्रातीवीर भगवान बिरसा मुंडा सभागृह, देवळी येथे क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांच्या १४८ व्या जयंती निमीत्य भव्य शोभायात्रा व समाज प्रबोधन कार्यक्रम २०२३ चे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदीवासी सेवक जनार्धन पंधरे, राजेश बकाने, माजी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, माजी नगराध्यक्षा सुचिता मडावी, नरेंद्र मदनकर, बाबुलाव शेडमाके, माजी जि.प. सदस्य मयुरी मसराम, माजी नगराध्यक्ष मारोतराव विरपाते, बिरसा मुंडा उत्सव समितीचे अध्यक्ष खुशाल कुमरे उपस्थित होते.
यावेळी आदीवासी सेवक जनार्धन पंधरे, राजेश बकाने, माजी जि.प.अध्यक्ष नितीन मडावी यांनी समायोचीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक संतोष पट्टेयांनी केले तर संचालन राजेन्द्र मसराम यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीकांत सराटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खुशाल कुमरे, विजय सडमाके, वामन मसराम, किशोर आ़त्राम, अरुण आत्राम, प्रफुल इचकापे, उमेश मसराम, अतुल भलावी, सुरेश पेंदाम, सुरेश चिकराम, मंगेश धुर्वे, यांनी सहकार्य केले, कार्यक्रमाला सुरेश चिकराम, लक्ष्मण कुमरे, विष्णु सराटे व कार्यक्रमाकरिता मोठ्या संख्याने परिसरातील आदिवासी समाज व देवळीकर नागरिक उपस्थित होते.
