– लाहेरी पोलीस स्टेशन येथे दोन दिवस भव्य जनजागरण मेळावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली मधील लाहेरी सारख्या अधिक दुर्गम, अतिनक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील भागात शिक्षणाची, मार्गदर्शनाची कमतरता असल्यामुळे समाजातील मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या नागरिकांची दखल आता स्वतः लाहेरी पोलिसांनीच घेऊन येथील पीडित/दुर्लक्षित नागरिकांना मुख्य प्रवाहमध्ये आणण्याकरिता दीपावलीचे औचित्य साधून पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत ०६ आणि ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी लाहेरी पोलीस स्टेशन येथे एक दीपावली: आदिवासी बांधवांसोबत कार्य्रमाअंतर्गत भव्य जनजागरण मेळावा आणि भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आधार कार्ड मेळाव्याचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्राअंतर्गत आदिवासी बांधवांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ देण्यात आला. साड्यांचे तसेच जीवनावश्यक वस्तू वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात नागरीकांचे खालील प्रमाणे लाभ करून देण्यात आले :
१. ० ते ०५ वयोगटातील बालकांचे आधार कार्ड – ५५
२. P.M.kisan yojana KYC new ragistration- २७
३. IPPB खाते – २८
४. PAN कार्ड – ०२
५. आभा कार्ड – २७
६. ई-श्रम कार्ड – १२
७. जे आय पॉलिसी – ०२
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सीआरपीएफ ३७ बटालियनचे सीओ खोब्रागडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य, जन नायक बिरसा मुंडा, यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उप पोस्टे लाहेरी चे प्रभारी अधिकारी संतोष काजळे यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. त्यामध्ये त्यांनी लाहेरी भागातील नागरिकांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही कायम तत्पर असू असे आश्वासन दिले. तसेच गावातील सुशिक्षित युवकांनी पुढे येण्याची गरज आहे असे सांगितले. तसेच नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या विविध योजनांचे व त्याबाबत असलेले लाभ याबाबत सखोल मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा व प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
परि. पीएसआय अभिजीत काळे यांनी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत चालू करण्यात आलेल्या विविध योजने बाबत नागरिकांना व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक,आरोग्य, शैक्षणिक, सक्षमीकरण करण्याचे आश्वासित केले. तसेच मेळाव्याची रूपरेषा सांगितली.
त्यानंतर कार्यक्रमास प्रशांत डगवार आणि सचिन सरकटे यांनी आलेल्या सर्व नागरिकांना, महिलांना, पोलीस स्टेशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमास लाहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील, विविध गावांमधील लोक मोठ्या प्रमाणावर हजर होते. तसेच विविध खेड्यापाड्यांमधून खूप मोठ्या प्रमाणावर महीलांनी, युवक युती नागरिकांनी, मोठ्या प्रमाणावर मेळ्याव्यास हजेरी लावली होती.
कार्यक्रमाच्या दुसर्या टप्प्यात अध्यक्षांच्या व परि. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत काळे व लाहेरी पोलिसांच्या हस्ते जमलेल्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. मेळाव्याच्या दोन्ही दिवशी हजर असलेल्या सर्व नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची धुरा उप पोस्टे लाहेरी चे पीएसआय प्रशांत डगवार यांनी सांभाळली. पीएसआय पसचिन सरकटे यांनी अतिदुर्गम भागातून पायी चालत मेळाव्यास आलेल्या महिलांचे, नागरिकांचे व प्रमुख पाहुण्यांचे व सदर कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेणारे एसआरपीएफचे व उप पोस्टे लाहेरी, सी आर पी एफ चे अंमलदार व अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष लाहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संतोष काजळे व प्रमुख पाहुणे सीआरपीएफचे सीओ खोब्रागडे, अशोक कुमार टि, पोलीस निरीक्षक शीतला प्रसाद हे होते. कार्यक्रमास सीआरपीएफ बटालियन ३७ कंपनी ए व सी चे पोनि व सर्व जवान उपस्थित होते. तसेच विविध गावचे तरुण युवतींन, महिला वर्ग एकूण अंदाजे पाचशे नागरिक मेळाव्यास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व अंमलदार, त्यामध्ये स.फौ.मचिरके, पोहवा/, राजेंद्र भांडेकर,परसा, सुरजागडे, प्रमिला जुमनाके, मनोहर पुराम, नापोशि / पुसू कंगाली, विनोद बुरांडे, फिरोज गाठले, अजय कांगणे, गोंगलू तिम्मा पोशि /गोवर्धन सूर्यवंशी, महादेव घुगे, राकेश मेश्राम, विनोद बावणे, अशोक मडावी केतन मस्के, कृष्णा कोतकोंडवर मपोशी आचल कुमरे, वालदे, दुधे, अल्लमवार हे हजर होते. तसेच एसआरपीएफ चे अधिकारी, व अंमलदार आदींनी परिश्रम घेतले.
