विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Balharpur) : चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्ती कुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा सेवा दिन म्हणून सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने बल्लारपूर तालुक्यातील विसापुर येथील मातोश्री वृद्धाश्रमात फळे व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार बंटी भांगडिया यांना आशीर्वाद देत दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व उज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस साजरा करण्याचा हा आगळा-वेगळा सामाजिक उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमास माजी राजुरा चे माजी आमदार संजय धोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या वेळी आशिष देवतळे, शेख जुम्मन, संजय मुप्पीडवार, श्रीनिवास चेरकूतोटा, प्रकाश दोतपेल्ली, सौरभ मेनकुदळे, भूषण पेटकर, शिवाजी चांदेकर, शुभम बहुरिया, प्रफुल शास्त्रकार, स्वप्निल खामनकर, अक्षय धारणे, निलेश ताजने, रामसेवक मोरे, संदीप शेरकी, शिवाजी सेलोकर, महादेव जयस्वाल, अजीम बेग, योगेंद्र केवट, कुणाल पारखी, सुयोग कोंगरे, शुभम थिपे, इम्रान पाशा आदींची उपस्थिती होती.
सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन आनंदात व जल्लोषात हा वाढदिवस साजरा केला. सामाजिक जाणीवेचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणास्थान ठरेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
