Latest Posts

कत्तली साठी नेणाऱ्या ४ गोवंश ची सुटका पीकअप वाहन सहित ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : कत्तली साठी घेऊन जाणाऱ्या ४ गोवंश ची बल्लारपूर पोलीसांनी सुटका करून पीकअप वाहन सहित ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. आरोपी वाहन चालक प्रतीक महेंद्र धंदरे (२५) रा. बामणी याला अटक केले असून संदीप यादव रा. भगत सिंग वॉर्ड बल्लारपूर हा फरार आहे.

बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे सफौ रमेश मेश्राम हे २८ मार्च रोजी रात्री ८ ते २९ मार्च सकाळी ८ वाजे पर्यंत कर्तव्य बजावत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की गोल पुलिया मार्गाने पीकअप वाहन ने गोवंश ची कत्तल साठी नेत आहे. त्या आधारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासह गोल पूला जवळ सापळा रचत पीकअप वाहन क्रं. एमएच ३४ बीझेड १६६१ या वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यात गोवंश जातीचे २ गाय किंमत अंदाजे ३० हजार रुपये व २ कालवड किंमत अंदाजे २० हजार रुपये मिळून आले. पोलिसांनी आरोपी प्रतीक महेंद्र धंदरे याची अधिक चौकशी केली असता संदीप यादव रा. भगतसिंग वॉर्ड बल्लारपूर याचे गोवंश असून चंद्रपूर येथे कत्तली साठी नेण्यात येत आहे. या वरून बल्लारपूर पोलीसांनी आरोपी विरुध्द कलम ११७,८३, सह प्राणी रक्षण अधिनियम ११(१)(ड), ५(अ), ५(ब), ९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

सदर कारवाई बल्लारपूर चे ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपनिरीक्षक सौरभ साळुंखे, सफौ रमेश मेश्राम, पोअं २३३२ संदेश सैनिक दर्शन यांनी केले.
बल्लारपूर शहरात मोठ्या प्रमाणात गोवंश मास विक्री होत असून या कडे पोलीस विभाग दुर्लक्ष करीत आहे.

Latest Posts

Don't Miss