Latest Posts

२८ एप्रिल रोजी सेवा हक्क दिन साजरा करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यामध्ये ग्रामीण व जिल्हास्तरावर येत्या २८ एप्रिलला सेवा हक्क दिन साजरा करण्यासाठी शासनाने निर्धारीत केलेले विविध उपक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, अविश्यांत पंडा यांनी शुक्रवार १८ एप्रिल ला आयोजित बैठकीत दिल्यात.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन साजरा करण्यासंदर्भातील पूर्व तयारीचा आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, सुहास गाडे, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, गडचिरोली, रंजित यादव, सहायक जिल्हाधिकारी, तथा उपविभागीय अधिकारी, अहेरी कुशल जैन, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, एटापल्ली नमन गोयल, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पात्र व्यक्तींना पारदर्शक कार्यक्षम समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि व्यक्तींना पात्र लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागांमध्ये पादर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी राज्यात २८ एप्रिल पासून लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने या वर्षीपासूनच २८ एप्रिल हा सेवा हक्क दिन, म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या कायद्याची दशकपूर्तीही होत आहे.

या निमित्ताने जिल्ह्यातील ग्रामपंचायत जिल्हा परिषद जिल्हा प्रशासन, नगर परिषदा व नगर पंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये राबवायच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर आदर्श आपले सरकार केद्राचे उद्घाटन करणे. विशेष ग्रामसभेचे आयोजन करून लोकसेवा हक्क कायद्याच्या ठळक तरतुदींचे वाचन करून ग्रामपंचायत सदस्यांना कायद्याच्या प्रती वितरीत करणे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या कायद्याची माहिती देणार सुचना फलक लावणे, अधिसूचित सेवांची व शुल्काची माहिती देणारे क्यूआर कोड लावणे आदी उपक्रम राबविण्याबाबतही यावेळी मार्गर्शन करण्यात आले.

जिल्हास्तरावर सेवा हक्क दिननिमित्ताने विविध समारंभाचे आयोजन करून लोकसेवा हक कायद्याचे वैशिष्ट्ये विषय करणे आणि विविध विभागांकडून देण्यात येणाऱ्या सेवांच्या आढावा घेवून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे. जिल्ह्यात सेवा दूत योजना सुरू करणे, नागरिकांना एसएमएसद्वारे या कायद्याबाबत व आपले सरकार पोर्टलची माहिती देणे, शाळा व महाविद्यालयांमध्ये या कायद्याच्या जागृतीसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करणे लोककलाद्वारे या कायद्याचा प्रचार-प्रसार करण्याबाबतच्या सूचनाही या प्रसंगी देण्यात आल्या. असे निवासी उपजिल्हाधिकारी, सुनिल सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss