Latest Posts

२१ जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यादृष्टीने महिलांच्या तक्रारी अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. येत्या सेामवारी (२१ जुलै ) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांच्या तक्रारी असल्यास जिल्हा स्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करताना अर्जासोबत जिल्हाधिकारी यांना उद्देशुन विहित नमुन्यातील अर्ज द्विप्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. महिलांनी स्वत: उपस्थित राहणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात नसलेले अर्ज, न्याय प्रविष्ट प्रकरणे सेवा विषयक आस्थापना विषयक प्रकरणे, तसेच तक्रार निवेदने वैयक्तिक स्वरुपाची नसल्यास स्विकारण्यात येणार नाही.

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर आणि चौथ्या सोमवारी तालुका स्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. असे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss