Latest Posts

१० मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने १० मे रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डी. पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये जिल्हयातील हजारो न्यायालयीन प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी सर्व संबंधित पक्षकारांनी लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सचिन पाटील यांनी केले आहे.

लोकअदालतीचा मुख्य उद्देश न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे त्वरीत निकाली काढून पक्षकारांना त्वरीत न्याय देणे हा आहे. जिल्हयात न्यायालयांमध्ये प्रलंबित प्रकरणांची व दाखलपूर्व प्रकरणांमधील तडजोड योग्य प्रकरणांची छाननी करुन आपसी समझोत्याकरीता प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येत आहेत. १० मे रोजी संपुर्ण राज्यात उच्च न्यायालय व त्यांची सर्व खंडपीठे, जिल्हा न्यायालय, सर्व न्यायाधीकरण आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे.

Latest Posts

Don't Miss