विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bandara): तुमसर-कोका रेल्वे मार्गावर एका अनोळखी पुरुषाचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील पोल क्र. १०५७/२१-२५ स्थानकाजवळ घडली. लोको पायलटने याबाबत माहिती देत घटनेची नोंद केली आहे.
मृतकाचा अंदाजे वय ३० वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. मृतकाच्या ओळखीचा शोध सुरू आहे. रेल्वे ट्रॅकवर झालेल्या या अपघातामुळे परिसरात हलचाल निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिस स्टेशन मोहाडी येथे याप्रकरणी मर्ग नोंद करण्यात आली आहे. आधिक तपासासाठी रेल्वे विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.
