Latest Posts

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०१६-२०१७ या वर्षापासून लागू करण्यात आली. शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलीं प्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. २६ डिसेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, सन २०२४-२०२५ मध्ये वसतिगृह व स्वाधार योजनेचा https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे नागपूर जिल्हयात तसेच तालुक्या च्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सन २०२४-२०२५ करीता वसतिगृह प्रवेशा करीता अर्ज केलेल्या परंतु वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता भाडेकरारनामा, उपस्थिती प्रमाणपत्र, ५ कि. मी प्रमाणपत्र अपलोड करुन Convert करुन अर्ज १० डिसेंबर पर्यंत ऑनलाइन सादर करावा.

अन्यथा आपण स्वाधार योजनेसाठी इच्छुक नाही असे समजून आपला अर्ज रद्द करण्यात येईल, असे जाहीर आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन शासकीय आय. टी. आय समोर, श्रध्दानंद पेठ, दीक्षाभूमी चौक, नागपूर येथे संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss