Latest Posts

यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका आमंत्रित

– अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२५ पर्यंत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२४ करीता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पाठविता येणार आहेत.

१ जानेवारी  ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य सहित्य आणि संस्कृती मंडळ, रविंद्र नाटयमंदीर  इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई – ४०००२५ यांच्या कार्यालयात  तसेच  संबंधित जिल्हयांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणुक शाखा) विनामुल्य उपलब्ध होतील.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नविन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०२४  नियमावली व प्रवेशिका या शिर्षाखाली व Whats new या सदरात Late Yashwantrao Chavan State Literature Award २०२४ Rules Book and Application Form या शिर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या

 http:// sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पुर्णत: भरून आवश्यक साहित्यासह सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ या विहीत कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

लेखक/ प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात. लेखक/ प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफावर /पाकिटांवर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार २०२४ साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम ३१ जानेवारी २०२५ आहे. विहीत काल मर्यादेनंतर ३१ जानेवारी २०२५ येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत, असे सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss