Latest Posts

थांबणार ते सुधीर मुनगंटीवार कसले ! तोच वेग अन् विकासाची तीच गती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : महाराष्ट्र राज्यात ऐतिहासिक बहुमतांन महायुतीचं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्रीपद मिळाल्याने विदर्भातआनंदाची लहर उठली. मात्र मंत्रीमंडळ जाहीर होताच याच विदर्भात निराशेचे ढगही दाटून आले. राज्याचे मंत्रीमंडळ जाहीर झाले पण त्यात राज्यातील भाजपाचे अनुभवी, अभ्यासू आणि कल्पक नेते सुधीर मुनगंटीवार याना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. पण सुधीर मुनगंटीवार यानी मात्र सगळ्या गोष्टी बाजुला ठेवून कामाचा सपाटा लावला आहे. मतदारसंघातील दौरे, लोकांशी संवाद, कामांची पाहणी, विविध कार्यक्रमांना उपस्थिती अशा दिनचर्येत ते व्यस्त झाले आहेत, हे विशेष.

सुधीर मुनगंटीवार याना मंत्रिमंडळातून तावल्याच्या पक्षश्रेष्ठीच्या भूमिकेमुळे मुनगंटीवार समर्थकांना चांगलाच धक्का बसला, तशी नाराजीही कार्यकत्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केली आणि पक्षश्रेष्ठींनी निर्णय बदलवण्याची विनंतीही केली. मुनगंटीवार यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर अभियानच छेडण्यात आले. मुनगंटीवार समर्थकांनी तर मुरुयमंत्री देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहून सुधीर मुनगंटीवार याना मंत्रिमंडळात स्थान का देण्यात आले नाही? असा भेट प्रश्नच केला. कुणी कवितेच्या माध्यमातून मुनगंटीवारांच्या कार्याचा गौरव करून त्याची महती पदक्षश्रेष्ठींपुढे पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर अनेक संदेश व्हायरल होत आहेत. त्यातील काहींचा यात आम्ही समावेश करीत आहोत. सुधीर मुनगंटीवार साहेब, सकट कितीही मोठी असली तरी जनता कायम तुमच्या पाठीशी आहे. तुमचं धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे असे मॅसेज लिहुन सरकारदरबारी लक्ष वेधण्याचा प्रयत्न कार्यकत्यांकडून सुरु आहे. प्रत्येक आव्हान ही नवी संधी आहे. सुधीर मुनगंटीवार साहेब, तुमच्या नेतृत्वाने महाराष्ट्राला नवी दिशा मिळाली आहे. हिंमत हारू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत’ अनेक कार्यकत्यांनी मुनगंटीवारांना या परिस्थितीतही खंबीर साथ देण्याचा विश्वास दिलाय.

सुधीर मुनगंटीवार साहेब, तुमच नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची हमी आहे. संकट दूर होऊन विजय तुमचाच होईल. असा आशावादही काही कार्यकत्यांनी व्यक्त केलाय. नेता तोच, जो संकटामध्येही उभा राहतो. सुधीर मुनगंटीवार, जनता तुमच्यासोबत आहे. तुमचं धैर्य आम्हाला स्फूर्ती देत, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या भावनाना वाट मोकळी करून दिली. मुनगटीवार साहेब, महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीशी उभी आहे. तुमचं काम आणि समर्पण कायम प्रेरणादायी आहे. एकूण मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरवच सर्वस्तरातून सुरू आहे.

सदस्यता अभियानासाठी सरसावले –

या संपूर्ण वातावरणात सुधीर मुनगंटीवार भाजपच्या सदस्यता अभियानाच्या बाबतीतही कमालीचे गंभीर आहेत. अभियान उत्तमरित्या राबविले जावे यासाठी ते सरसावले आहेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी भाजपा सदस्यता अभियान हे प्रभावी साधन आहे. एकत्रित प्रयत्न, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रभावी प्रचाराच्या मदतीने अभियान पूर्ण यशस्वी करण्यासाठी पूर्ण शक्तीने भाजप सदस्यता अभियान राबवा, अशा सूचना आमदार मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दूरदृष्टीप्रणाली‌द्वारे आयोजीत मिटींग‌द्वारे दिल्या.

 कोणत्याही परिस्थितीत हिंमत हारू नका –

जनता सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही एक चैर्यवान आणि कर्तव्यनिष्ठ नेता आहात. कोणत्याही परिस्थितीत हिंमत हारू नका. तुमच्या नेतृत्वाखाली सर्वांना प्रगतीचा मार्ग मिळेल, अशा शब्दात मुनगंटीवार यांच्या समर्थकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करीत मुनगंटीवार यांच्या सोबत असल्याची प्रचीती दिली आहे. सुधीर मुनगंटीवार साहेब, तुमच प्रामाणिकपण आणि जनतेसाठी झटण है प्रत्येकाच्या मनाला भिडणार आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी तुमच्या कष्टांच योगदान अविस्मरणीय आहे. सकट कितीही मोठी असली तरीही, जनता तुमच्यासोबत ठामपणे उभी आहे. आपण हिंमत कधीही हारु नका. तुमच्यासारख्या इदनिश्चयी नेत्यामुळेच महाराष्ट्राता उज्ज्वल भविष्य मिळू शकतः, अशी अपेक्षाही कार्यकत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तोच वेग आणि विकासाची तीच गती –

मंत्रीमंडळात असताना अनेक कामांना मंजुरी देणं असो की अनेक अडचणीचा जलदगतीन निपटारा करण असो, सुधीर मुनगंटीवार यांचा त्यात हातखंडा होता. मंत्रीमंडळातून नाव वगळण्यात आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार नाराज आहे असा गैरसमज होता. मात्र मुगुनगटीवार गानी पक्षादेश पातून पुन्हा त्याच जोगाने जनतेच्या प्रश्नांकडे सवा देण्यास सुरुवात केल्यामुळे कार्यकत्यांमध्ये हुरूप चढला आहे. तोच बैग आणि विकासाची तीच गती, हा विचार महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वात विकासाच्या कामावर जोर देणान्या अनेक नेत्यांचा आहे. सुधीर मुनगटीवार है अशा नेतृत्वांपैकी एक आहेत, ज्यांनी आपल्या कार्यकाळात वेगाने विकासकामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे, अशा शब्दात अनेकांनी प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss