विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर(Nagpur) : हातमाग उद्योगाला चालना मिळावी व विणकरांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना लौकिक मिळावा. या उद्देशाने विभागीय हातमाग कापड स्पर्धा दरवर्षी घेतल्या जातात. सन २०२४-२५ या वर्षाच्या विभागीय स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असलेल्या आंधळगावचे विणकर गोपीचंद भोजराम निनावे यांनी आपल्या हातमाग केंद्रातून उत्पादीत केलेल्या साडीला प्रथम क्रमांकाचा लौकिक प्राप्त करुन दिला.
या स्पर्धेसाठी नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील २३ विणकरांनी भाग घेतला त्यातून प्रथम पुरस्कार २५ हजार रुपये गोपीचंद भोजराम निनावे आंधळगाव ता. मोहाडी जि. भंडारा यांना करवत काठी या वाणासाठी देण्यात आला. द्वितीय पुरस्कार २० हजार रुपये विभागूण गणेश गुमगांवकर, नागपूर यांना भोजन पट्टीकरीता व रामदास नंदनवार, नागपूर यांना सुरभी डिझाईन चादरकरीता देण्यात आले. तृतीय पुरस्कार चैताली हेडाऊ, धापेवाडा ता. कळमेश्वर, नागपूर यांना देण्यात आला.विभागीय कापड स्पर्धा प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाला विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त संजय दैने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, लिपीका चक्रवर्ती, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ठुबरीकर, उपसंचालक बुनकर सेवा केंद्र नागपूर, गजभिये सहायक वस्त्रोद्योग आयुक्त् हे समिती सदस्य म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सिमा पांडे यांनी केले तर संचालन रोहणकर यांनी केले.
विभागीय कापड स्पर्धा प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त संजय दैने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, लिपीका चक्रवर्ती, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ठुबरीकर, उपसंचालक बुनकर सेवा केंद्र नागपूर, गजभिये सहायक वस्त्रोद्योग आयुक्त् हे समिती सदस्य म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सिमा पांडे यांनी केले तर संचालन रोहणकर यांनी केले.
