Latest Posts

वेंकटापूर येथील बक्षीस वितरण कार्यक्रम आविसं- काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या हस्ते संपन्न

– माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या तर्फे बक्षीस वितरण

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : तालुक्यातील व्येंकटापूर येथील सार्वजनिक नवयुवक गणेश मंडळ व्येंकटापूर तर्फे भव्य व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी पहिला- दुसरा- तिसरा असे तीन पुरस्कार ठेवण्यात आले होते. आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या तर्फे विजय संघानां आविसंचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नीता तलांडे, काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवजी, सरपंच अजय आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला.

यावेळी आविसंचे नेते शंकर मंदा, नेते मल्लिकार्जुन आकुला, मारुती गणपूरवार, माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला, लक्ष्मण बोल्लेसह आविसं- काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss