Latest Posts

वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी करावी

–  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० अन्यये महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांना HSRP बसविण्याची तरतुद करण्यात आली आहे.

या वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP बसविणे आवश्यक असून मा. सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिलेले आहेत. त्याअन्वये भंडारा जिल्ह्यातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना HSRP बसविण्याकरिता पुढीलप्रमाणे सुचना जारी करण्यात येत आहेत.

– भंडारा जिल्ह्याकरिता M/Sfta HSRP SOLUTION PVT  LTD ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून HSRP नंबर प्लेट बसविण्याकरिता www.transport.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन वाहनधारकांनी विहित शुल्क भरावे.अन्यथा इतर कोणत्याही अनधिकृत संकेत स्थळावर जाऊन बुकींग करुन नये,ज्यामुळे आपली फसवणुक होणार नाही.यांची काळजी घ्यावी.
– वाहनधारक भंडारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त भंडारा जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास HSRP नंबर प्लेट वसविणे आवश्यक आहे.
– सदर IISRP नंबर प्लेट बसविण्याकरीता पुढीलप्रमाणे शुल्क हे GST वगळून आकारण्यात येणार आहे.
– वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्या संदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठा चारकांच्या पोर्टलवर तसेच भंडारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करू शकतात.

वाहनाचा प्रकार व शुल्क –
–  दुचाकी/ट्रॅक्टर           रुपये 450/
–  तीन चाकी               रुपये 500/-
– इतर सर्व वाहने        रुपये 745

भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना सुचित करण्यात येते की, त्यांच्या वाहनाचर HSRP नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे / उत्तरविणे / दुय्यम प्रत/ विमा अद्ययावत करणे इ. कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.

याद्वारे HSRI नंबर प्लेट नसलेली वाहने, अनावट HSRP नंबर प्लेट असलेली वाहने इ. वाहनांवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भंडारा विभागानी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss