Latest Posts

वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Balharpur): वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पंचशील व धम्मवंदना पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष हेमंत मानकर, सचिव व संस्थापिका रजिया खान, मुख्याध्यापक विजय शिंदे, मुख्याध्यापिका शबिस्ता सय्यद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या फरजाना शेख तसेच शिक्षकवृंद आणि संपूर्ण कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

मुख्याध्यापक विजय शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील मूलभूत विचार मांडत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. मुख्याध्यापिका शबिस्ता सय्यद यांनी बाबासाहेबांच्या कार्याची ओळख करून दिली, तर शिक्षिका प्रणाली गोरघाटे यांनी त्यांच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकला. शिक्षकांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गीते सादर केली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका उषा मडावी आणि वनिता रंगारी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

Latest Posts

Don't Miss