विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पास्टर जॉन जॉर्ज, संस्थेचे अध्यक्ष व संचालक हेमंत मानकर, सचिव व संचालिका रजिया खान, मुख्याध्यापक विजय शिंदे, मुख्याध्यापिका शाबिस्ता सय्यद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या फरजाना शेख, अरमान खान सह शिक्षकवृंद व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारित विविध प्रकारची नृत्ये सादर केली.
पास्टर जॉन जॉर्ज यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी माहिती देताना विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व सांगून नाताळच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षिका अरुणा मातंगी यांनी प्रभु येशू ख्रिस्ताचे गुणगान गाऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षिका अंकिता सिरी, मयुरी पोहनकर आणि ज्योती अनिवर्ती यांनी सुंदर गाण्याचे सादरीकरण केले. सर्व मुलांना सांतातर्फे चॉकलेट व भेटवस्तू देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका जयश्री दोडिपेल्लीवार व शिक्षिका निहारिका हायारण यांनी केले. आभार शिक्षिका सृष्टी बेलखोडे यांनी मानले.
