Latest Posts

माजरीत दोन गटात हाणामारी : ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : माजरी येथील आठवडी बाजारात दोन गटात हाणामारी झाल्याच्या माहितीच्या आधारे माजरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून ७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर घटना १७ मार्च रोजी रात्री १० वाजता आठवडी बाजार परिसरात घडली.

शिवजयंतीनिमित्य शहरात निघणाऱ्या मिरवणुकीसाठी माजरी पोलिस बंदोबस्तात व्यस्त होते. यावेळी आठवडी बाजार परिसरात दोन गटात हाणामारी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलीस उपनिरीक्षक धनराज पंचोडबरिया हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले असता दोन्ही गट एकमेकांना मारहाण करत असल्याचे त्यांना दिसले. पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून हल्लेखोरांना ताब्यात घेतले. चौकशीत हल्लेखोरांनी सांगितले की, जुन्या वादातून दोन गटात भांडण झाले होते. या आधारे पोलिसांनी माजरी येथील रहिवासी निवासी रोहित रामचंद्र शेवडैया (२२), विक्की उर्फ इंद्रजीत तेजबहादूर शेवडैया (२४), अरुण मुन्ना कुसमैय्या (२२), अनुराग अशोक केसकर (२०), अमित अशोक केसकर (२४), संदीपकुमार रामचंद्र कैथल (२३) और सौरव सिध्दार्थ रामटेके (१९) यांच्याविरुद्ध कलम १९२(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास माजरी चे पोलीस निरीक्षक अमित पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोजराम लांजेवार तपास करत आहेत.

Latest Posts

Don't Miss