विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : पडोली येथील मुख्य चौकात मालवाहू ट्रक उभे असल्याने अपघाताला ते कारणीभूत ठरत आहेत. चंद्रपूर-नागपूर या मुख्य महामार्गावरच हे ट्रक उभे केले जात असल्याने रोज या चौकात अपघात होत आहेत. अश्यातच एसटी महामंडळाची एक बस ट्रकला रात्री धडकल्याने बसचा वाहक जागीच ठार झाला, तर चालक सहित १३ प्रवासी गंभीर जखमी झाले. संदीप मुरलीधर वनकर रा. नगिनाबाग चंद्रपूर असे मृतक वाहक चे नाव आहे.
१४ मार्च ला रात्री ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूर आगाराची एसटी बस क्रं. एमएच १४ केए ८५८७ ही नागपूर वरून चंद्रपूर ला येत होती. अश्यातच पडोली येथे राखेच्या धुळी मुळे चालकाला समोरचे काही ही दिसले नाही. त्यामुळे अचानक रस्त्यावर उभ्या असलेले ट्रक ला धडक लागली. धडक इतकी जोरात होती की पत्रा कापून वाहक ला काढण्यात आले. तसेच एसटी चे कर्मचारी सिद्धार्थ मडामे हे गंभीर झाले आहे. तसेच एसटी चालक दत्तात्रय मधुकर इंगोले हे सुध्दा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पडोली पोलीसांनी ट्रक क्रं एमएच ३१ सीए ३१७१ चा चालक राजन बनवरी यादव याच्यावर ट्रक रस्त्यावर उभा करून वाहतूकस अडथडा व दुर्घटेनेस कारणीभूत असल्याने कलम १२५(ब), १२५(अ), १०६(१) बीएनएस, १८४, १३४ मो.अ. का अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, एसटी कामगार संघटनेने आज बसस्थानकात आंदोलन करीत मृत वाहक संदीप वनकर याच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत द्यावी अशी मागणी केली आहे. संदीप वनकर या वाहकाच्या मृत्यूनंतर आज सकाळपासून चंद्रपूर एसटी आगारात वाहक चालक व कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला आहे. मृत वाहकाला ५० लाखांची नुकसान भरपाई द्यावी व राखेच्या टँकरच्या कंपनी विरोधात विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. जोवर या दोन्ही मागण्या पूर्ण होत नाही तोवर चंद्रपूर आगारातून कुठलीही एसटी बाहेर न पडू देण्याचा इशारा संपकऱ्यांनी केला होता.
