Latest Posts

भद्रावती येथे ट्रक ची दुचाकीला धडक : एकाचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका / चंद्रपूर (Chandapur) : भद्रावती येथे ट्रक ने दुचाकीला धडक देत पायावरून ट्रक नेल्याने एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाले. संजय बालाजी कुरेकर (५४) रा. मानोरा (सिंगरू) ता. भद्रावती जि चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.

१७ मार्च रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृतक संजय कुरेकर हे दुचाकी क्रं एमएच ३४ सीए ७८२२ ने भद्रावती येथून आपल्या गावी मानोरा (सिंगरू) ने जात असताना भद्रावती टप्पा येथे नागपूरहून चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रं एमएच ३० बीडी ४१८१ ने दुचाकीला धडक दिली. त्यात मृतक संजय कुरेकर यांचा दोन्ही पायावरून ट्रक गेल्याने तुटले तसेच त्यांच्या छाती ला गंभीर दुखापत झाले. त्यांना भद्रावती येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचे मृत्यू १७ मार्च रोजी दुपारी २.२० वाजता झाले.

मृतक संजय कुरेकर यांचा मुलगा रूपेश कुरेकर यांनी भद्रावती पोलीस स्टेशन येथे १८ मार्च रोजी दुपारी २.४५ वाजताच्या दरम्यान याबाबत तक्रार दिली. भद्रावती पोलिसांनी ट्रक चालक अमरसिंह भैयाराम दिवान रा. कसडोल (छत्तीसगढ) याचा विरुध्द १०६(१), २८१ बीएनएस, १३४(बी), १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश देवगडे करीत आहे.

Latest Posts

Don't Miss