Latest Posts

खाजगी आस्थापनांनी प्रशिक्षणार्थीसाठी जागा अधिसुचित कराव्या

– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत खाजगी आस्थापनांनी शासन निर्णयाचे अधिन राहून युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरण्याकरीता जागा अधिसूचित कराव्या, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण  योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापना, शैक्षणिक संस्था, कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयांनी आस्थापनेध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी भरण्याकरीता आस्थापनेची नोंदणी www.mahaswayam.gov.in या नवीन आस्थापना नोंदणी करता व www.cmyky.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे. नोंदणी नसल्यास  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रास भेट देऊन आस्थानाची नोंदणी करुन घ्यावी. खाजगी आस्थापनेमध्ये मध्ये कमीत कमी २० मनुष्यबळाच्या अनुषंगाने एकुण १० टक्के उत्पादन क्षेत्र व २० टक्के प्रमाणे सेवा क्षेत्र या नुसार शासन निणयाप्रमाणे कार्यवाही करुन प्रशिक्षणार्थी भरण्यात येणार आहे. खाजगी आस्थापनाजवळ रोलवर असलेले कमीत कमी २० मनुष्यबळांबाबत पीएफ, इपीएफ, ईएसआयसी कपात करण्याबाबतचे प्रपत्र व जीएसटी, डीपीआयटी, उद्योग आधार, सर्टीफिकेट ऑफ ईनकॉरपोरेशन ईत्यादीची नोंदणी केलेली असावी.

बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा ६ हजार, आयटीआय/पदविका उत्तीर्ण युवकांना ८ हजार व पदविधर/पदव्युत्तर युवकांना १० हजार असे भरघोस विद्यावेतन दिले जाणार आहे. हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने दरमहा  सहा महिन्यापर्यंत जमा करण्यात येईल, या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी १४ मार्च पर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे अर्ज सादर करावे.

याचबरोबर उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल ३५ वर्ष असावे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खातेही आधारशी संलग्न असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे. त्या आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभागाशी संपर्क साधता येईल. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss