Latest Posts

रेल्वेची धडक बसून वाघाचा मृत्यू : बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावरील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : विदर्भात वाघांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीजवळ रविवारी १९ जानेवारीला पुन्हा एक संतापजनक घटना घडली. जिल्ह्यात आणखी एक वाघ मरण पावला. ट्रेनच्या धडकेने वाघाचा मृत्यू झाला.

बल्लारशाह – गोंदिया रेल्वे मार्गावरील सिंदेवाही ते आलेवाही स्थानकादरम्यान रविवारी सकाळी रेल्वे रुळांजवळील झुडपात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. या मार्गावरून जाणाऱ्या रक्सौल एक्स्प्रेसची धडक बसल्याने या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Latest Posts

Don't Miss