Latest Posts

दुभाजकाला धडकून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : चिमूर-वरोरा मार्गावरील खडसंगी जवळ तनिस भरलेला अनियंत्रित ट्रॅक्टर दुभाजकावर आदळून उलटला. या घटनेत ट्रॅक्टर चालक मयूर सुकरे याचा जागीच मृत्यू झाला. २८ जानेवारी ला रात्री ११ वाजता खडसंगी गावा जवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर चालक मयूर प्रभाकर सुकारे (२२) रा. मोठेगाव तहसील चिमूर हे ट्रॅक्टर मध्ये तनीस भरून वरोराकडे जात होते.  रात्री ११ वाजताच्या सुमारास खडसंगी गावाजवळ ट्रॅक्टर क्रं एमएच ३४ सीडी ६५६६ वरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर दुभाजकावर आदळल्याने ते पलटी होऊन जागीच ठार झाले.

घराबाहेरचा आवाज ऐकून खडसंगी पोलीस पाटील दीपक पाटील बाहेर आले असता ट्रॅक्टर पलटी झाल्याचे दिसले व मृत चालकही तेथे दिसला. पोलीस पाटील दीपक पाटील यांच्या तक्रारीच्या आधारे चिमूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी चिमूरचे पीएसआय घनश्याम नवखरे तपास करत आहेत.

Latest Posts

Don't Miss