Latest Posts

तीन महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यातील ६० शिवभोजन केंद्र अनुदानाविना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : राज्य शासनाकडून गोरगरिबांसाठी शिवभोजन योजना राबविली जात आहे. दुपारी ११ ते २ या वेळेत गरजूंना माध्यान्ह भोजन थाळी केवळ १० रुपयांत दिली जाते. त्यामुळे गोरगरिबांची एकवेळच्या स्वस्त जेवणाची गरज भागत आहे. परंतु डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी आदी तीन महिन्यांपासून शिवभोजन थाळीचे शासकीय अनुदान अद्यापही रखडले आहे. त्यामुळे दररोज हजारो गरिबांचे पोट कसे भरावे असा प्रश्न उभा ठाकल्याने शिवभोजन केंद्र चालकांत नाराजीचे वातावरण आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवभोजन योजनेला सुरुवात झाली. त्यानंतरच्या महायुती सरकारनेसुद्धा ही योजना सुरू ठेवली. त्यामुळे गरिबांना दुपारच्या जेवणाची सोय झाली. लॉकडाउन काळापासून या योजनेने अनेकांना आधार दिला, भंडारा जिल्ह्यात सध्या ६० शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. पहिल्या येणाऱ्या लाभार्थ्याला प्राधान्य या तत्त्वानुसार दुपारी ११ ते २ या वेळेत शिवभोजन दिले जाते. त्यामध्ये वरण, भात, भाजी आणि दोन चपात्या यांचा समावेश आहे.

प्रत्येक थाळीमागे असे मिळते अनुदान-

शहरांसाठी एका थाळीमागे शासन ४० रुपये अनुदान देते. १० रुपये लाभार्थ्यांकडून घेतले जातात. ग्रामीण भागासाठी ३५ रुपये शासन, तर १० रुपये लाभार्थी देतात. अनुदानातून शिवभोजन केंद्र चालविले जातात. शिवभोजन केंद्रात लाभार्थ्यांना २ वरण-भात, भाजी आणि दोन चपात्या दिल्या जातात. १० रुपयांत पोटभर जेवण देण्याची सोय शिवभोजन केंद्रातून होत आहे.

३ तास सुरू राहते गोरगरिबांसाठी शिवभोजन केंद्र –
गरजु लोकांना मध्यान्ह भोजनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केले. दुपारी ११ वाजतापासून सुरू होणारे केंद्र २ वाजतापर्यंत सुरू राहते. गोरगरीबांना पोटभर भोजनाची सुविधा या माध्यमातून उपलब्ध होते.

दररोज बदलतो मेनू-
शिवभोजन केंद्रात गरजुंसाठी अन्न शिजविले जात असले तरी दररोजचा मेनू बदलता ठेवला जातो. हंगामानुसार मेनूमध्ये विविध पदार्थाचा समावेश केंद्र संचालकांकडून केला जातो. सण, उत्सवात गोड पदार्थही दिले जातात.

महागाईमुळे ५० रुपयांतही थाळी परवडेना-
शहरांसाठी एका थाळीमागे शासन ४० रुपये अनुदान देते. १० रुपये लाभार्थ्यांकडून घेतले जातात, असे ५० रुपये केंद्र चालकांना मिळतात. या अनुदानातून अनुदानातून शिवभोजन शिवभोज केंद्र चालविले जातात. शिवभोजन केंद्रांवरून १० रुपयांत लोकांना हे भोजन मिळते.

दररोज गोरगरीब व गरजूंच्या जेवणाची सोय-
भंडारा जिल्ह्यात दररोज अंदाजे ४००० जणांच्या एकवेळ जेवणाची सोय शिवभोजन केंद्रातून होते. यात ऑटो व रिक्षाचालक, मजूर, विद्यार्थी, खासगीत काम करणाऱ्यांचा समावेश आहे. नियमित शिवभोजन केंद्रांमुळे अनेकांना आधार मिळत आहे.

Latest Posts

Don't Miss