विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : वरोरा शहरातील पद्मालय नगर एकार्जुना येथील बंद घरातून चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २३ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. सेवानिवृत्त शिक्षकाच्या फिर्यादीवरून वरोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अशोककुमार जगदीशप्रसाद श्रीवास्तव रा. एकार्जुना, वरोरा हे माजरी येथील महावीर हिंदी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. झारखंडमधील धनबाद येथे २ मार्च रोजी त्यांचा मोठे साले रजनीकांत प्रसाद यांचे निधन झाल्याने ते घराला कुलूप लावून पत्नीसह तेथे गेले होते. २३ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता वरोरा येथे पोहोचलो तेव्हा दरवाजाचे कुंडी तुटलेली दिसली पण कुलूप तुटलेले नव्हते. मात्र मागील दरवाजाचे व बेडरूमचे कुलूप तुटलेले दिसले. आतील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडले असून कपाटात ठेवलेले तीन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले. श्रीवास्तव यांच्या तक्रारी वरून वरोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरोरा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
