Latest Posts

विज्ञान प्रसारासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना सुधाकर आठले पुरस्काराची संधी

– मराठी विज्ञान परिषदेचे आवाहन

–  २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): समाजामध्ये विज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी किमान १० वर्षे सातत्याने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी ६० वर्षांखालील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

मराठी विज्ञान परिषद ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून विज्ञान प्रसाराचे कार्य करत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून, ज्या व्यक्तींनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाची कास धरण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, अशांचा गौरव या पुरस्काराद्वारे केला जातो. २५,००० रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अर्जासाठी अटी व आवश्यक कागदपत्रे –
वयोमर्यादा: अर्जदार व्यक्तीचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.
अनुभव: विज्ञान प्रसार क्षेत्रात किमान १० वर्षांचे योगदान आवश्यक.
आवश्यक माहिती: अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा, कार्यक्षेत्र, कामाचे स्वरूप, राबवलेल्या कार्यक्रमांचा अहवाल, छायाचित्रे, प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे आणि पूर्वी मिळालेल्या पुरस्कारांची माहिती जोडणे आवश्यक आहे.

येथे संपर्क साधावा –
इच्छुकांनी आपला सविस्तर अर्ज २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावा:
पत्ता: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई – ४०००२२.

अधिक माहितीसाठी परिषदेच्या (०२२) ४८२६ ३७५० / ००९४ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९९६९१००९६१ (मंगळवार वगळता, सकाळी ११ ते ५) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. तसेच office@mavipa.org या ईमेलवर किंवा www.mavipa.org या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध असल्याचे कार्यवाह दिलीप हेर्लेकर यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss