विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनोरंजन प्रतिनिधी / मुंबई (Mumbai) : छावा या सिनेमाने जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाने नऊ दिवसांत ३०० कोटी क्लबमध्ये एण्ट्री घेतली आहे. १४ फेब्रुवारीपासून आतापर्यंत छावाने तब्बल २२८.२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. व्हॅलेंटाइन डेला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून छावाने रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रणवीर-आलियाच्या गल्ली बॉय या सिनेमाच्या नावावर होता.
पहिल्या आठवडयात २२५ कोटी कमाई केल्यावर या सिनेमाने आठव्या दिवशी २४.०३ कोटी रुपये कमावले, तर नवव्या दिवशी दुसरा शनिवार असूनही कलेक्शनमध्ये ८७ टक्क्यांची मोठी वाढ झाली. अशा प्रकारे एकूण नऊ दिवसांचे कलेक्शन तब्बल २९३.४१ कोटी रुपये इतके झाले. नवव्या दिवशी सिनेमाने मुंबईत ७४ टक्के, पुण्यात ८५.७५ टक्के आणि चेन्नईत ८१.५० टक्के इतके कलेक्शन केले.
