Latest Posts

स्वाधार योजनेच्या नुतनीकरण व नवीन अर्जासाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नुतणीकरण व नविन अर्ज सादर करण्यासाठी १५ मार्च पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. कनिष्ठ, वरिष्ठ व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात सन २०२४-२५ या वर्षात प्रवेशित अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी https://hmas.mahait.org या लिंक वरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे.

ज्यांनी या पुर्वी ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. त्यांनी अर्जाची प्रिंट काढून सर्व कागदपत्र व आधार संलग्न बँक पासबुकाच्या हार्ड कॉपीसह कार्यालयात जमा करावे, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss