विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी सन २०२४-२५ मधील अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता विद्यार्थ्यांना १५ जानेवारीपर्यंत https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदी आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करुन देण्यात येते.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे संपर्क साधावा व पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
