विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : कोणत्याही कठिण प्रसंगी महिलेला मार्गदर्शन मिळून उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे आणि प्रत्येक ठिकाणी गरज भासल्यास मदत मिळणे सोपे व्हावे, याकरीता आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे द्वारा स्त्रीशक्ती पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे.
सदर स्त्री शक्ती या पोर्टलव्दारे शासकीय / निमशासकीय / खासगी / विद्यालये / महाविद्यालये / जिल्हा परिषद शाळा / आशा वर्कर / अंगणवाडी सेविका / रुग्णालय / पोलीस विभाग / वकिल / महिला संबंधित काम करणाऱ्या संस्था तसेच इतर कोणतेही छोटे- मोठे व्यवसाय करणाऱ्या किंवा इतरठिकाणी काम करणाऱ्या महिलांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करणे व संकटकाळी मदत मिळणे तसेच मार्गदर्शन मिळून उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे सोयीचे होईल.
याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रकाश भांदककर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली तसेच कु. प्रणाली सुर्वे, केंद्र प्रशासक (प्र.), सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.
स्त्री शक्ती पोर्टलवर नोंदणी कसे करायचे ? Google वर जावून strishakti.org या वेबसाईट वरुन महिलेचे सपूर्ण नाव, ई-मेलकिंवा मोबाईल क्र., पत्ता, जन्म तारिख टाकून नोंदणी करणे. तसेच पासवर्ड स्वत: तयार करुण घेणे. संपर्क कुठे करावा ? कार्यालय संपर्क क्रमांक- ०७१३२-२९५६७५ कार्यालय मोबाईल क्रमांक- ९४०४३५४५४३ कार्यालय पत्ता- जुनी धर्मशाळा,जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, मुल रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली.
