Latest Posts

राज्य युवा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : सन २०२३-२४ या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप युवक युवती रोख ५० हजार रुपये, संस्थेस १.०० लक्ष तसेच गौरव पत्र, सन्मानचिन्ह राहणार आहे.

राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार  आहे. राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज १५ फेब्रुवारीपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीत जास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असुन युवा वर्ग मोठ्या संख्येने संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहे. युवामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्यांचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार देण्यात येतात.

Latest Posts

Don't Miss